तुम्ही काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्यातील नकारात्मक भावना दूर करू शकता
नकारात्मक भावना मनात येणे फार सामान्य गोष्ट आहे मात्र वेळीच हिला थांबवले पाहिजे
जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत सापडता तेव्हा प्रथम स्वतःला दोष देणे थांबवा
प्रत्येक घटनेची चांगली आणि वाईट दोन्ही बाजू बघा, यामुळे स्वतःबद्दल कमी नकारात्मक वाटेल
जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांमध्ये अडकाल तेव्हा असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल
फेरफटका मारा, संगीत ऐका, एखादा मजेदार टीव्ही शो पहा या गोष्टी करून आपले मन शांत करा
तुम्ही यावेळी व्यायाम करू शकता, व्यायाम केल्याने वाईट हार्मोन्स पडण्यास मदत होते
अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही डायरी लिहून तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता
नकारात्मकतेमुळे मानसिक आरोग्यालाही हानी पोहोचते, अशावेळी ध्यान करणे फायद्याचे ठरेल