देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र तामिळनाडूतील एका दुकानदाराने टोमॅटो विकून लोकांना खूश केले आहे.

तामिळनाडूतील कुड्डालोरमधील एका व्यक्तीने केवळ 20 रुपये किलोने टोमॅटो विकले.

टोमॅटोच्या दराचा परिणाम इतर भाज्यांवरही होत आहे.

 एका व्यक्तीला केवळ 1 किलोच टोमॅटो मिळणार असा नियमही घालण्यात आला. 

 सध्या टोमॅटोचा भाव किलोमागे 120 ते 130 रुपये आहे. 

याआधीही 2019 मध्ये कांदा 100 रुपये किलो झाला होता, तेव्हा फक्त 10 रुपये किलोने कांदा विकला होता.

 2019 मध्ये ओपनिंग ऑफर म्हणून दुकानदाराने कमी किमतीत भाज्या विकल्या होत्या.

 दुकानदाराने 60 रुपयांना टोमॅटो विकत घेतला आणि 'गरजूंना मदत' करण्यासाठी ते फक्त 20 रुपये किलोने विकले.