पाऊस वेळेत न आल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले.

 टोमॅटोचे भाव तब्बल चार पटीने वाढले आहेत. 

टोमॅटो 100 रुपये प्रती किलो झालेला आहे. 

वांगीसुद्धा 100 रुपये प्रती किलो आहे. 

 कोथिंबीरीची जुडी, हिरवी मिरची सुमारे 120 रुपयांच्या घरात गेलेली आहे. 

पावसाळ्यात गरमागरम आल्याचा चहा पिताना विचार करावा लागणार आहे, कारण आलं 200 रुपये झालं आहे.

 मटार 100 रुपये किलोने विकला जातोय

 दोडका 80 रुपये किलो झालेला आहे. 

सिमला मिरची जवळपास 80 रुपये किलोच्या घरात आहे.