टूथब्रश वापरून खराब झाला की फेकून देण्याऐवजी त्याचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी उपयोग करा. 

 बाथरुमच्या, स्वयंपाकघराच्या टाईल्समध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश वापरा. 

लॅपटॉप, कॉम्प्युटरचा किबोर्डवरील धूळ स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश खूप उपयोगी पडतो.

पाण्याच्या बाटल्या या स्वच्छ, साफ करण्यासाठीही टूथब्रश कामी येतो.

केसांना डाय करण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो. 

हातापायाच्या नखांची स्वच्छता करण्यासाठीही टूथब्रश वापरू शकता. 

दागिने स्वच्छ करण्यासाठीही टूथब्रश उपयोगी पडतो. 

खिडक्यांच्या जाळ्यांवरची लहान छिद्र स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश वापरा.  

घरातील नळ साफ करण्यासाठीही तुम्ही टूथब्रशचा वापर करू शकता.