मे महिन्यात पुन्हा एकदा टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या कारने पहिले स्थान पटकावले आहे.
मारुतीची प्रिमियम हॅचबॅक कार Marui Baleno ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे.
बलेनोच्या एकूण 18,733 युनिट्सची विक्री केली आहे जी गेल्या वर्षी याच महिन्यात 13,970 युनिट्स होती.
मारूतीचीच स्विफ्ट ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.
मे महिन्यात या कारच्या एकूण 17,349 युनिट्सची विक्री झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 14,133 युनिट्स होती.
मारूतीची वॅगनआर तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
मे महिन्यात या कारच्या एकूण 16,258 युनिट्सची विक्री झाली, गेल्या वर्षी मे महिन्यात 16,814 युनिट्सची विक्री होती.
Hyundai Creta ने पुन्हा एकदा जबरदस्त बाजी मारलेली आहे. मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी चौथी कार आहे.
टाटा मोटर्सची SUV Tata Nexon ही देशातील पाचवी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.