काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना विजेचा धक्का लागून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे दररोज जीममध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ट्रेडमिलवर धावणे हा एक चांगला कार्डिओ व्यायाम आहे. मात्र त्याचवेळी आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं आहे.
ट्रेडमिलवर व्यायाम करणाऱ्यांनी ट्रेडमिलचे मॅन्युअल वाचावे.
ट्रेडमिल ओलसर जागेपासून दूर ठेवावे,
ट्रेडमिलसाठी एक्स्टेंशन कॉर्ड किंवा अडॅप्टर वापरणे धोकादायक असू शकते.
ट्रेडमिल वापरताना आरामदायक कपडे आणि योग्य ऍथलेटिक शूज घाला.
बर्याच आधुनिक ट्रेडमिल्समध्ये आपत्कालीन स्टॉप बटण किंवा सुरक्षा टिथर सारखी वैशिष्ट्ये असतात.
ट्रेडमिल कन्सोलवर पाण्याच्या बाटल्या किंवा इतर द्रव पदार्थ ठेवणे टाळावे.