Triumph ने भारतात Speed Twin 1200 TFC सादर केली आहे. TFC म्हणजे Triumph Factory Custom, ज्यामध्ये खास डिझाइन आणि प्रीमियम फिनिश दिली जाते.
Picture Credit: officialtriumph
ही मोटरसायकल जगभरात फक्त 750 युनिट्समध्ये तयार केली जाणार आहे. प्रत्येक बाईकला स्वतंत्र क्रमांक दिला जाणार असल्याने तिची एक्सक्लुझिव्ह ओळख कायम राहील.
Picture Credit: officialtriumph
या बाईकमध्ये 1,200cc पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. वेगवान अॅक्सेलरेशन आणि स्मूथ परफॉर्मन्समुळे ही बाईक स्पोर्टी रायडिंगचा अनुभव देते.
Picture Credit: officialtriumph
बाईकमध्ये Öhlins सस्पेन्शन, Brembo ब्रेक्स आणि Akrapovič टायटॅनियम सायलेंसरसारखे प्रीमियम घटक देण्यात आले आहेत, जे तिची कामगिरी आणखी सुधारतात.
Picture Credit: officialtriumph
कार्बन-फायबर बॉडी पार्ट्स, गोल्ड डिटेलिंग, स्पेशल पेंट स्कीम आणि प्रीमियम सीटमुळे Speed Twin 1200 TFC चा लूक इतर मॉडेल्सपेक्षा वेगळा दिसतो.
Picture Credit: officialtriumph
या मोटरसायकलमध्ये Cornering ABS, Traction Control, Quickshifter आणि विविध Riding Modes सारखी आधुनिक तंत्रज्ञानाची फीचर्स देण्यात आली आहेत.
Picture Credit: officialtriumph
Triumph Speed Twin 1200 TFC ची भारतातील एक्स-शोरूम किंमत ₹21 लाख आहे. ही कंपनीच्या सर्वात प्रीमियम मॉडर्न-क्लासिक बाइक्सपैकी एक मानली जाते.
Picture Credit: officialtriumph