हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला होणे हे सामान्य मानले जाते. यासाठी विविध प्रकारे उपाय केले जातात. यामध्ये कोरडा खोकला होणे ही एक समस्या आहे
जर तुम्हाला कोरडा खोकला होत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा. जाणून कोरड्या खोकल्यावरील घरगुती उपाय
हळद आणि काळी मिरी या दोन्हीमध्ये करक्यूमिन अॅण्टी इंफ्लेमेटरी, अॅण्टी बॅक्टेरियल सारखे गुण असतात. कोरड्या खोकल्यासाठी तुम्ही हे दोन्ही एकत्र खावे
जे लोक रोज मिठाच्या पाण्याने गुळण्या करतात त्यांना कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्यायल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शिअम सारखे गुणधर्म असतात
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळविण्यासाठी तूप आणि काळी मिरी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. यामध्ये अॅण्टी इंफ्लेमेटरी, अॅण्टी बॅक्टेरियल सारखे गुण असतात.
कोरड्या खोकल्यासाठी आपल्या आहारामध्ये आल्याचा समावेश करु शकता. यामध्ये अॅण्टी माइक्रोबियल सारखे गुण असतात. तुम्ही याचा चहा देखील पिऊ शकता.
कोरड्या खोकल्यासाठी या गोष्टीचे सेवन करताना हे लक्षात ठेवा की ते मर्यादित प्रमाणात खावे. जास्त खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.