Published Oct 14, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतीय बर्गर म्हणून ओखळल्या जाणाऱ्या वडापावचे आणि मुंबईचे अनोखे नाते आहे.
महाराष्ट्रातील सर्वात प्रिय स्ट्रीट फूडपैकी एक, पावभाजी. या डिशला कोथिंबीर, चिरलेला कांदे आणि लिंबू यांनी सजवले जातं.
मिसळ पाव हा एक मसालेदार आणि चवदार पदार्थ आहे ज्याचा उगम महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात झाला आहे.
भेळ पुरी हा एक प्रकारचा चाट आहे, जो तिखट आणि मसालेदार स्वादासाठी ओळखला जातो.
पाणीपुरी हे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण भारताचे स्ट्रीट फूड आहे. त्याला गोलगप्पा म्हणूनही ओळखले जाते.
रगडा पॅटीस हे एक स्वादिष्ट स्ट्रीट फूड आहे. ही डिश विविध चटण्या, चिरलेला कांदा आणि शेव आणि कोथिंबीरसह सजवली जाते.
साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नाश्ता आहे, उपवासाच्या दिवसांत साबुदाणा वडा जास्त प्रमाणात खल्ला जातो.
कांदा भजीला कांदा फ्रिटर असेही म्हटले जाते, हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, विशेषतः पावसाळ्यात खायला सर्वांना आवडते.
दाबेली हा एक मसालेदार आणि गोड नाश्ता आहे. गुजरातच्या कच्छ प्रदेशात त्याची सुरुवात झाली
पारंपारिक महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूडमध्ये कोथिंबीर वडीचा समावेश होतो. अनेकदा चहा किंवा चटणीसोबत त्याचा आस्वाद घेतला जातो.