अक्षरा आणि अधिपतीचं जेजुरी दर्शन

 झी मराठीवरची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.

या मालिकेत अक्षरा अधिपतीचं लग्न झालं आहे आणि लग्नानंतर ते जेजुरीला खंडोबाचं दर्शन  घेणार आहेत.

खंडोबाच्या दर्शनासाठी अक्षराने खास नऊवारी साडी नेसली आहे आणि पारंपरिक दागिने घातले आहेत.

अधिपतीचाही ट्रॅडिशनल लूक लक्ष वेधून घेणारा आहे.

 अधिपती अक्षराला उचलून जेजुरीचा गड चढणार आहे.

 ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा ‘जेजुरी विशेष भाग’ 18 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता प्रेक्षकांना झी मराठीवर पाहता येणार आहे.

शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचं पात्र साकारत आहेत. 

अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात पुढे काय घडणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.