तुळशीच्या पानांमुळे वाढेल चेहऱ्याचं सौंदर्य
तुळशीची पानं चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा स्वच्छ होते. सगळी घाण निघून जाते आणि चेहऱ्याचा रंग चांगला होतो.
तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून तुम्ही चेहऱ्याचं क्लीझिंग करू शकता.
तुळशीच्या पानांमुळे चेहऱ्यावरील मुरुमं, डाग कमी होण्यास मदत होते.
चेहरा जास्त तेलकट वाटत असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांची पेस्ट वापरू शकता.
तुळशीमध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट गुणधर्मामुळे सुरकुत्यांपासून बचाव करता येतो.
तुळशीच्या पानांपासून बनवलेला फेस मास्क तुमच्या चेहऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करेल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळस ही जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे.
तुळशीच्या वापराने दृष्टी सुधारते, त्वचेची चमक वाढते आणि केसांची वाढ होते.
श्वासाची दुर्गंधी रोखण्यासाठीही तुळस अत्यंत गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.
तुळस ही एक औषधी वनस्पती आहे जीअनेक रोग दूर करते आणि शारीरिक शक्ती वाढवते.