तुळशी पूजनाच्या दिवशी करा हे उपाय 

Life style

22 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये तुळशी पूजन हे देखील येते. यंदा 25 डिसेंबर रोजी तुळशी पूजन आहे. तुळशी पूजन मोठ्या उत्सवात आणि भक्ती भावाने साजरा केले जाते

कधी आहे तुळशी पूजन दिवस 

तुळशी पूजनाच्या दिवशी दिव्याच्या संबंधित काही उपाय केल्यास नशिबाची साथ मिळू शकते. जाणून घ्या उपाय

दिव्याशी संबंधित उपाय

दिव्यात थोडी हळद टाकणे

तुळशी पूजनाच्या दिवशी दिवा लावताना त्यामध्ये थोडी हळद टाकून लावल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतात 

नशिबाची मिळेल साथ

तुमची अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होण्यासोबतच इच्छा पूर्ण होतील. याशिवाय तुम्हाला नशिबाची साथ लाभेल.

तुळशीजवळ दिवा लावा

तुळशी पूजनाच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते 

आर्थिक लाभ 

नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासोबतच तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होईल. यामुळे पैशांची तिजोरी भरलेली राहील.

दिव्याखाली तांदूळ ठेवा

जर तुम्ही दिवा ठेवत असाल तर त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवा. त्यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतील. 

दिवस रात्र होईल प्रगती 

कर्जाच्या समस्यातून सुटका होण्यासोबतच दिवस रात्र प्रगती देखील होईल. याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये हळूहळू उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील