यंदा तुळशी विवाह शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी घरात कोणत्या शुभ वस्तू आणणे शुभ मानले जाते जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
कार्तिक महिन्यातील तुळशी विवाह हा अत्यंत पवित्र सोहळा मानला जातो. या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणण्याची धार्मिक परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
साखर गोडवा आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी ती घरी आणणे शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
तुपाचा दिवा पूजेत लावण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार तूप पवित्रता आणि मंगलतेचे प्रतीक आहे.
Picture Credit: Pinterest
नारळाला शुभफळ मानले जाते. कोणत्याही मंगल कार्यात त्याचा वापर केला जातो. तुळशी विवाहासाठीही नारळ आणू शकता.
Picture Credit: Pinterest
पूजेमध्ये फळांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. केळी हे भगवान विष्णूंच्या पूजेत अर्पण केले जाणारे फळ आहे.
Picture Credit: Pinterest
हळद-कुंकू हे सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. तुळशी विवाहाच्या पूजेत त्याला विशेष महत्त्व आहे.
Picture Credit: Pinterest
झेंडू आणि इतर सुगंधी फुलांनी तुळशी वृंदावन सजवले जाते. पूजेसाठी फुलांची माळ आणणे शुभ मानले जाते.