‘भाग्य दिले तू मला’  मालिकेत तुषार दळवींची एन्ट्री

कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत कावेरी आणि राज यांनी अनेक संकटांवर यशस्वीरित्या मात केली. 

कावेरी आणि राजला कायम रत्नमालाची साथ लाभली.

 मालिकेत रत्नमालाची भूमिका निवेदिता सराफ साकारत आहेत.

 मालिकेमध्ये आता रत्नमालाचा नवरा आणि राजचे बाबा जिवंत असल्याचं सत्य मोहिते कुटुंबीयांसमोर येणार आहे. 

ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी रत्नमालाचा नवरा म्हणून अनिरुद्ध मोहिते यांची भूमिका साकारणार आहेत.

 लवकरच तुषार दळवी यांची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

नव्या पात्रामुळे मालिकेत वेगळा ट्विस्ट येणार आहे.

 तुषार दळवींना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.