ट्विटरने 25 लाखांहून अधिक Accounts केली Ban! जाणून घ्या काय आहे खरे कारण?

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ट्विटरने भारतातील २.५ लाख खाती निलंबित केली आहेत. तसेच, कंपनीने 2,249 खाती पूर्णपणे बंद केली आहेत.

देशात दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांमुळे ही खाती बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ट्विटरने भारतात एकूण 25,53,881 खाती बंद केली आहेत.

ट्विटरने नवीन IT नियम, 2021 च्या पालनाबाबत आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, त्यांना तक्रार निवारण यंत्रणेद्वारे भारतीय युजर्सकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

कंपनीने सांगितले की, या तक्रारींच्या संदर्भात कंपनीने तीन खात्यांचे पुनरावलोकन करून त्यावर बंदी घातली आहे. उर्वरित अहवालानुसार खाती निलंबित करण्यात आली आहेत.

कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी प्रत्येक तक्रारीचा विचार केला आणि नंतर सर्व बाबींचा विचार करून खात्यांवर कारवाई केली.

Twitter नुसार, भारतीय युजर्सकडून तक्रारी मुख्यतः गैरवर्तन/छळ (83), संवेदनशील प्रौढ सामग्री (41), द्वेषपूर्ण आचरण (19) आणि बदनामी (12) संबंधित होत्या.

एका अहवालानुसार, ट्विटरने भारतासह जागतिक स्तरावर सामग्री प्रतिबंधित किंवा अवरोधित करण्याच्या 83% सरकारी विनंत्या स्वीकारल्या आहेत.