फुटबॉल विश्वातील अनभिषिक्त सम्राट लिओनेल मेस्सी आता पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट, जाणून घ्या याचे नेमके कारण
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गतवर्षी वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा जिंकली
आता मेस्सी आगामी २०२६चा वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट
मागील म्हणजे २०२२ ची स्पर्धा ही माझी कदाचित अखेरची वर्ल्ड कप स्पर्धा होती, असे मी यापूर्वी अनेकदा सांगितले असल्याचे लिओनेल मेस्सीने म्हटले आहे.
मी पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचे ठरवले आहे, पुढच्या विश्वचषकात मी अर्जेटींनाकडून खेळताना दिसणार नाही
आगामी वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होईल, त्या वेळी मेस्सी ३९ वर्षांचा असेल
मेस्सी म्हणतो, सध्या मी पुढील विश्वचषक न खेळण्याचे ठरवले आहे.
मेस्सी म्हणाला, मी पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचे ठरवले असले तरीही भविष्यात काय होईल, हे मी सध्याच्या घडीला सांगू शकत नाही
आता मेस्सी अर्जेटींनाकडून फार कमी काळ खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे