जास्वंदीच्या फुलाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

जास्वंदीचं फूल लाल,गुलाबी,पिवळ‌ा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये येतं.

जास्वंदीच्या फुलामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्याविषयी जाणून घेऊयात.

जास्वंदीच्या फुलाचा चहा प्यायल्यामुळे चांगली झोप लागते.

ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा.

पोटाचे विकार असतील त्यांनी जास्वंदीच्या फुलांचा किंवा जास्वंदीच्या पानांचा पाला अथवा पावडर याचं सेवन करावं.

चेहऱ्याच्या मुरुमांसारख्या अनेक समस्या या फुलांच्या फेस पॅकमुळे दूर होतात.

केस गळत असल्यास जास्वंदीच्या फुलाचे तेल उपयुक्त ठरतं.