जेवढा मेहंदीचा रंग गडद असतो तेवढा लग्नातील आनंद वाढतो. काहीवेळा मेहंदीला रंग येत नाही. मेहंदीचा रंग चढण्यासाठी कोणत्या युक्त्या वापरायच्या जाणून घ्या
मेहंदी सुकल्यावर लिंबू साखरेचे मिश्रण कॉटनच्या कपड्याने हातावर लावा. यामुळे मेंदीचारंग गडद होतो.
मेहंदीच्या पेस्टमध्ये थोडी कॉफी पावडर आणि चहाचे पाणी मिसळल्याने रंग गडद होतो. हा एक जुना आणि प्रचलित उपाय आहे.
सुखलेल्या मेहंदीवर लवंगाची वाफ देणे सोपी पद्धत आहे. वाफेमुळे रंग गडद होतो.
हातावर मेहंदी लावल्यानंतर कमीत कमी 6 ते 8 तास पाण्यात हात घालू नये. जेवढ्या वेळ मेहंदी हातावर राहील तेवढा रंग चढण्यास मदत होईल.
मेहंदी सुखल्यानंतर हाताला मोहरीचे तेल लावावे. तेल गरम होते आणि रंग गडद होतो.
मेहंदी काढल्यानंतर 24 तास हाताला साबण लावू नका. साबण रंग फिका करतो. यामुळे साबणाचा वापर करु नका
केमिकलयुक्त मेहंदी रंग उजळवते पण जास्त काळ टिकत नाही. नैसर्गिक मेहंदीचा रंग हळूहळू खोलवर जातो आणि जास्त काळ टिकतो