कोपर काळे होणे ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक लोकांना त्रास देते. तुम्हीपण या समस्येपासून त्रस्त असाल तर या टिप्स वापरुन पाहा
लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. यासाठी थोडा लिंबूचा रस घ्या आणि मधामध्ये मिसळून कोपराला लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांने धुवा
थोडीशी हळद आणि दूध घेऊन त्याची पेस्ट बनवा. हे लावल्यानंतर 10 मिनिटांनी धुवा. हळद त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते
कोरफडीच्या जेलमध्ये त्वचेला उजळवणारे आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. दररोज कोपरांवर जेल लावल्याने काळे डाग कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी कोपराला नारळ किंवा बदामाचे तेल लावा. हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करते आणि कोपर मऊ करते
बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून हल्की पेस्ट तयार करा. हे आठवड्यातून 2-3 वेळा हातावर लावा. हे मृत त्वचा काढून टाकते आणि रंग उजळ ठेवते.
कोपरांवरील त्वचा जाड आणि कोरडी होते आणि काळी दिसते. दररोज मॉइश्चरायझिंग क्रीम लावल्याने त्वचा मऊ आणि हलकी राहते
सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर तुमच्या कोपरांना सनस्क्रीन लावा; सूर्यकिरणांमुळे तुमचे कोपर आणखी काळे होऊ शकतात.