प्रत्येकाला स्फॉट टॉय आवडतात. यामध्येही बहुतेकांना टेडी बेअर आवडते
10 फेब्रुवारीला टेडी बियर डे सेलिब्रेट करण्यात येत आहे.
या टेडी बियरचा जन्म कसा झाला जाणून घ्या.
अमेरिकेचे 26 वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट, ज्यांना टेडी म्हणूनही ओळखले जाते, शिकारीला गेले होते.
तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही रुझवेल्ट कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकले नाही.
यानंतर एका अस्वलाला झाडाला बांधल्याचे त्यांना दिसले.
झाडाला बांधलेल्या अस्वलाला जंगली कुत्रे चावले होते, अस्वलाला खूप जखमा झाल्या होत्या.
त्यांनी अस्वलाची शिकार केली नाही, मात्र चाकूने मारण्यास सांगून त्याची त्रासातून सुटका करण्यास सांगितले.
वॉशिंग्टन पोस्टच्या क्लिफर्ड बेरीमन नावाच्या राजकीय व्यंगचित्रकाराने या प्रसंगाचे व्यंगचित्रही काढले होते.
या व्यंगचित्रामुळे रुझवेल्ट यांची प्रतिमा लोकांच्या नजरेत उंचावली.
त्यांच्या नावावरून स्टफ्ड बेअरचे नाव टेडी बेअर असे ठेवण्यात आले.