वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये काय असेल खास ?

भारतातली सेमी हाय स्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत नवीन माहिती मिळाली आहे.

रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेनचं डिझाईन ठरवलं आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

या स्लीपर ट्रेनचा लूक आतून कसा असेल याचे काही ॲनिमेटेड फोटो समोर आले आहेत.

स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये लग्झरी कोच आणि भरपूर जागेची सोय करण्यात आली आहे.

 वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर व्हर्जनमध्ये 20 ते 22 कोच असतील.यात  857 बर्थ असतील. या 857 बर्थपैकी 823 बर्थ प्रवाशांसाठी आणि 34 बर्थ स्टाफसाठी राखीव असणार आहेत.

या ट्रेनमध्ये पँट्रीची सोय असेल. ट्रेनमध्ये वाय-फाय असेल. शिवाय एलईडी स्क्रीनदेखील लावण्यात येणार आहेत ज्याद्वारे प्रवाशांना प्रवासाविषयी माहिती मिळेल.

या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही सोय करण्यात येणार आहे.

या स्लीपर ट्रेन फेब्रुवारी- 2024 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.