Published Jan 25, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
साधारणपणे घरामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचे वास्तूमध्ये विशेष महत्त्व असते. घराच्या छतावर ठेवलेल्या वस्तूंचेही वेगळे वास्तू महत्त्व आहे.
घराच्या छताचा ग्रहांशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते. या कारणास्तव, छतावर ठेवलेल्या वस्तूंचे वास्तु नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे.
घराच्या छतावर उत्तर दिशेला निळ्या रंगाचे फूल किंवा रोपे लावणे शुभ मानले जाते. निळ्या रंगांचे रोपटे लावणे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
निळ्या फुलासोबतच पांढऱ्या रंगांचे फूलदेखील उत्तर दिशेला लावणे फायदेशीर मानले जाते. यामुळे घरात सुख-शांती नांदते.
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या छतावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे. यामुळे छतावर कधीही तुटलेले फर्निचर ठेवू नये.
जर तुम्ही छतावर तुळशीचे रोप ठेवत असाल तर ते खूप शुभ आहे. तुळशीजवळ रोज दिवा लावल्याने घरातील सकारात्मकता वाढते.
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीला खूप महत्त्व आहे. पाण्याची टाकी नेहमी पश्चिम- दक्षिण दिशेला ठेवावी.