वास्तुशास्त्रानुसार, ही कामं झोपण्यापूर्वी केली तर लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दाराजवळ स्वच्छता असावी.
ज्या घरात अस्वच्छता असेल त्या घरात लक्ष्मी कधीही वास करणार नाही.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानली जाते.
झोपायच्या आधी ही दिशा स्वच्छ करा. तिजोरी या दिशेला ठेवा.
सकाळच्या पूजेसाठी फुले, फळे आणि इतर साहित्य रात्रीपर्यंत पूजा खोलीत ठेवू नये.
संध्याकाळच्या आरतीनंतर शिळी फुले व दिवसभराचे पाणी काढून कलश स्वच्छ पाण्याने भरून ठेवावा.
जर तुम्हाला घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर कापूरसोबत लवंग घालून रात्री जाळावे.
वास्तूनुसार असे केल्याने संपत्ती वाढते आणि नकारात्मकता दूर राहते.