वास्तू शास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वास्तुदोष होतो. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशांतता निर्माण होते. 

काही गोष्टी उघड्या ठेवणे कटाक्षाने टाळावे, त्यामुळे वास्तू दोष लागतो. 

पुस्तक वाचून झाल्यावर बंद करुन ठेवावे, उघडे ठेवल्यास बुध ग्रह कमजोर होतो. 

अन्न उघडे ठेवल्यास घरात अन्नाचा तुटवडा भासतो, ते नेहमी झाकून ठेवावे. 

दूध आणि दही उघडे ठेवल्यास शुक्र कमजोर होतो, शरीरावर परिणाम होतो. 

कपाट उघडे ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातील समृद्धी कमी होऊ लागते.

मीठसुद्धा उघड्यावर ठेवू नये, त्यामुळे पत्रिकेतील चंद्र कमजोर होतो.