पूजा कक्षात कधीही झोपू नये कारण वास्तूनुसार झोपेच्या तामसिक शक्तींचा खोलीतील सात्विक शक्तींशी संघर्ष होऊ शकतो.

स्वयंपाकघरात दक्षिण दिशेला तोंड करून स्वयंपाक करू नये.

अभ्यासाच्या रुममध्ये कधीही डार्क, चमकदार रंग करू नये. त्याऐवजी पेस्टल कलर निवडा. 

 गच्ची कधीही अस्वच्छ ठेवू नका, त्यामुळे नकारात्मकता येते असे मानले जाते. 

तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. वास्तूच्या तत्त्वानुसार उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशेला ठेवावे.

 झोपताना तुमचे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तर दिशेला असावेत.

तुमच्या समोरच्या दाराची नेमप्लेट कधीही काळ्या रंगात रंगवू नका.

या गोष्टीचं पालन केल्यास घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते असं मानलं जातं.