वास्तूनुसार घरातील प्रत्येक गोष्ट केल्याने घरात सकारात्मकता निर्माण होते.
देव्हारा हे घरातील सर्वात महत्वाचे स्थान आहे.
वास्तूमध्ये मंदिरासाठी काही नियम दिले आहेत.
वास्तूमध्ये दिलेल्या नियमांनुसार देवघरातील मूर्ती केवळ 8-9 इंच असावी.
मूर्ती ठेवताना लक्षात घ्या की कोणत्याही देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका.
देवाची मूर्ती कायम प्रसन्न मुद्रेत असावी. क्रोधीत मूर्ती ठेवल्याने घरात अशांतता येते.
पूजेसाठी ईशान्य दिशा सर्वात योग्य आहे. पूजा करताना तोंड पूर्व दिशेला असावे.
पायऱ्यांखाली देवघर कधीही असू नये. मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत.