घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो असं वास्तूशास्त्र सांगतं.
त्यामुळे घराच्या प्रवेशद्वाराजवळ काय ठेवू नये हे आज आम्ही सांगणार आहोत.
मुख्य दारात शूट, चप्पल ठेवू नये. लक्ष्मी मुख्यदारातून प्रवेश करते असं मानलं जातं.
मुख्य दरवाजाबाहेर कचरा टाकू नये. त्याचा घरातील सदस्यांवर परिणाम होतो.
मनी प्लांट घराच्या मुख्य दाराजवळ लावू नये.
झाडूसुद्धा मुख्य दाराजवळ ठेवू नये असे वास्तूनुसार सांगितले जाते.
घराच्या दाराजवळ विजेचे खांब नसावेत, त्याचा घरातील स्त्रीयांवर वाईट परिणाम होतो असे म्हणतात.