वास्तूशास्त्रानुसार घरात मोरपीस असणं शुभ मानलं जातं.

मोरपीस घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी तर दूर होतातच, शिवाय सुख-शांतीही मिळते.

घरात मोरपीस कुठे ठेवावं याची दिशा जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

वास्तूनुसार घरामध्ये मोराची पिसे नेहमी पूर्व दिशेला ठेवावीत.

वास्तूनुसार ही दिशा मोरपीस ठेवण्यासाठी खूप शुभ मानली जाते.

पूर्वेला मोरपीस ठेवल्याने घरातील भांडणं संपतात,सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

घराच्या पूर्व दिशेचा स्वामी सूर्यदेव आणि इंद्रदेव मानला जातो.

तर, घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला मोरपीस ठेवल्यास धन मिळण्याची शक्यता निर्माण होते. 

त्यामुळे मोरपीस उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणेही वास्तूनुसार चांगले मानले जाते.