वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या उपायांमुळे घरामध्ये प्रगती होते आणि धनात वृद्धी होते.

घरात आर्थिक चणचण असेल तर तीन विशेष मूर्ती बसवल्याने पैशाची कमतरता दूर होते.

देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांच्या मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते.

हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. तर कुबेर संपत्तीचा देवता आहे.

कुबेराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरातून रोग आणि दारिद्र्य दूर होते.

वास्तूनुसार कुबेरची मूर्ती लॉकरमध्ये किंवा तिजोरीत ठेवावी. त्यामुळे आर्थिक प्रगती होते.

हिंदू धर्मात गणपतीला सुख आणि समृद्धीची देवता मानली जाते.

घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावल्यानेही घरात सुख-शांती राहते आणि कौटुंबिक कलह दूर होतात.

आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी इशान्येकडे कलश स्थापन करा.