वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या कधीही फुकट घेऊ नयेत.
चुकूनही मीठ कोणाकडूनही फुकट घेऊ नये. मिठाचा संबंध शनिशी आहे असे म्हटले जाते.
मीठ घ्यायला लागलेच तर त्याबदल्यात त्या व्यक्तीला दुसरी एखादी गोष्ट द्यावी.
वास्तूनुसार फुकटचे मीठ खाल्ल्याने आजारी पडू शकता, कर्जही वाढू शकते.
कपडे शिवण्यासाठी सुई देखील फुकट घेऊ नये.
वास्तूनुसार सुया मोफत घेतल्याने नकारात्मकता वाढते. कुटुंबातील प्रेमसंबंध बिघडतात.
वास्तूनुसार रुमाल सुद्धा फुकट दिलेला वापरू नये.
असे केल्याने दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, नात्यात दुरावा येऊ शकतो असं मानतात.
लोखंडी वस्तू फुकट घेऊ नये, तेल घेणेही निषिद्ध आहे, त्यामुळे आर्थिक चणचण भासू शकते.