वास्तूशास्त्रातल्या अनेक गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकता.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवलेल्या वस्तूंचे विशेष महत्त्व असते.
काही वेळा चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या दिशेला ठेवलेल्या वस्तूचा घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होतो.
अनेक वेळा तुम्ही विचार न करता घरात कोणत्याही ठिकाणी शू स्टँड ठेवता. जे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही.
वास्तूनुसार घरात चुकीच्या ठिकाणी शूज आणि चप्पल ठेवल्याने करिअर आणि आर्थिक कमतरता भासू शकते.
वास्तूनुसार घराच्या मुख्य दारावर शू स्टँड कधीही ठेवू नये.घाणेरडे आणि फाटलेले शूज आणि चप्पल कधीही ठेवू नका.
घराच्या उत्तर-पूर्व दिशेला शूज आणि चप्पल ठेवणे अशुभ आहे. यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकते.
शूज आणि चप्पल मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचे असल्यास ते उघडे ठेवू नका.
वास्तुशास्त्रानुसार शू स्टँड पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवणे चांगले.