या 5 गोष्टींमुळे वास्तूचं पावित्र्य बिघडण्याची शक्यता , आजच त्यांच्यापासून लांब राहा

वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर आणि आपल्या सभोवतालच्या गोष्टींवर मोठा प्रभाव पडतो. जसे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव.

बरेच लोक वास्तुशास्त्राचे नियम पूर्णपणे पाळतात आणि घरात असलेल्या वस्तूंनाही वास्तूनुसार योग्य दिशेने ठेवतात.

पण तरीही घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात.

चला जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. अशा घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात. म्हणूनच घराची नियमित स्वच्छता करा.

अनेकांना अशी रद्दी, जुनंपुराणं सामान घरात ठेवायची सवय असते की भविष्यात कधीतरी त्याचा उपयोग होईल. पण, खराब वस्तू किंवा तुटलेली वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवते.

वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्याही खोलीत पसारा नसावा. घर अस्ता-व्यस्त राहिल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होतात.

सुकलेली झाडे आणि झुडपे हे नकारात्मक उर्जेचे सर्वात मोठे घटक मानले जातात. म्हणून, सुकलेली झाडे आणि झुडपे घरात असू नयेत. असे झाल्यास घरात कलह निर्माण होण्याची शक्यता असते.

घर किंवा कामाच्या ठिकाणी कुठेही जाळे तयार होऊ देऊ नका. हे जाळे नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात. त्यामुळे घरांमध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात.