हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप असल्यास काही गोष्टींची काळजी घ्या.
तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर ते नेहमी हिरवे राहावे.
वास्तूनुसार तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. ते अशुभ मानले जाते.
तुळशीच्या रोपाची जागा कायम स्वच्छ असावी
वास्तूनुसार जिथे तुळस लावलेली आहे तिथे कचरा कधीही करू नये.
तुळशीची योग्य काळजी घेतल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते.
तुळशीला हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते, त्यामुळे सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी रोप ठेवा.
तुळशीच्या या नियमांचे पालन केल्यास आशीर्वाद मिळतो.