ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन

अभिनय सोडून अमेरिकेत झाले होते स्थायिक

दूरदर्शनवरील गाजलेली मालिका 'नुक्कड'मध्ये खोपडी ही व्यक्तिरेखा साकारली होती.

ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे काल (१५ मार्च) निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.

समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते.

ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे.

समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते.

त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मल्टिपल ऑर्गन निकामी झाल्याने काल पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

समीर यांना बोरिवलीच्या एमएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

पुढील स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा