दमदार अभिनय, गुड लूक जोरावर विकी कौशलने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपली छाप सोडली आहे.
सिनेमांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या विकी कौशलचा 16 मे ला वाढदिवस आहे.
विकी कौशल आज बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. पण हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. त्याने खूप स्ट्रगल केलं आहे.
विकी कौशलचे वडील श्याम कौशल हे देखील बॉलिवूडशी संबंधित आहेत. विकीचे वडील बॉलिवूडमधील प्रसिद्ध Action डायरेक्टर आहेत.
चित्रपटांमध्ये नाव कमावण्यापूर्वी विकीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. एकेकाळी विकी आणि त्याचं कुटुंब चाळीत राहायचे.
पण नंतर हळूहळू विकीच्या कुटुंबाची प्रकृती आर्थिक स्थिती सुधारू लागली. विकीने अभियांत्रिकीची पदवी घेतली.
फार कमी लोकांना माहित आहे की विक्की कौशलने 4 वर्षे B.Tech चे शिक्षण घेतले आहे..
'गँग्स ऑफ वासेपूर' मधून विकी कौशलने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
विकी कौशलने 2015 मध्ये 'मसान' या चित्रपटातून पदार्पण केले होते. पण एक अभिनेता म्हणून त्याला 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमातून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
विकीचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाने त्याला इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक बनवले.
विकी कौशलने राझी, सरदार उधम, बॉम्बे वेलवेट, लस्ट स्टोरीजसह अनेक चित्रपटात काम केले आहे.
विकी कौशलने अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न केले आहे. दोघंही आनंदात त्यांचं वैवाहिक आयुष्य जगत आहे.