भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन लांबून परदेशासारखे दिसते.
कुठे आहे भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन?
भारत-बांगलादेश सीमेवर असलेले हे देशातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे.
पश्चिम बंगालमधील हबीबपूर भागातील हे सिंहाबाद रेल्वे स्टेशन आहे.
स्वातंत्र्यापूर्वी हजारो लोक इथून ये-जा करत असत. कारण पूर्व बंगालमध्ये जाण्यासाठी हे मुख्य केंद्र असायचे.
महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे दिग्गज एकेकाळी इथून गेले होते, मात्र आता या स्थानकावर शांतता आहे.
हे विशेष रेल्वे स्थानक ब्रिटिशांनी बांधले होते. स्टेशनचा लूक अजूनही तसाच आहे.
सिंहाबाद रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून इतके जवळ आहे की इथून बांग्लादेश सहज दिसतो.