लखनऊ पराभवाच्या उंबरठ्यावर होतं. लखनऊचा खेळाडू नवीन उल हक विराटला नडला, आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली.
विराटने नवीनच्या कृतीबद्दल अंपयारकडे तक्रारही केली
.
RCB ने लखनऊला हरवले, जेव्हा खेळाडू हात मिळवत होते त्यादरम्यान विराट आणि नवीनमध्ये बाचाबाची झाली.
विराटने लखनऊचा मेंटॉर गंभीरला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या चर्चेचं रुपांतर वादात झालं.
गंभीर निघून गेल्यानंतर विराटने कोच विजय दाहिया यांनी नवीनच्या कृतीबाबत सांगण्याचा प्रयत्न केला.
लखनऊचा खेळाडू नवीन उल हकचे याआधीही शाहीद आफ्रीदीसोबत
वाद झाले होते.
काही दिवसांपूर्वी लखनऊने बंगळुरूमध्ये आरसीबीला हरवले तेव्हा खूप जल्लोष झाला होता. यावेळी विराटची पाळी आली तेव्हा त्याने त्याची पुनरावृत्ती केली.
या सामन्यात विराट खूपच आक्रमक दिसत होता.
लखनऊची टीम 126 धावांचे लक्ष्यही गाठू शकली नाही. विराटची स्टाईल त्यावेळी पाहण्यासारखी होती.
लखनऊने पहिल्या टप्प्यात RCB ला बंगळुरूमध्येच पराभूत केले होते.
RCB ने लखनऊला त्यांच्याच मैदानावर हरवत बदला पूर्ण केला असं म्हटलं जात आहे.