‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून तयार करण्यात आलेली चौथी विनाशिका आहे.
देशातील आजवरच्या सर्वांत कमी वेळेत तयार झालेल्या फ्रिगेट श्रेणीतील आयएनएस ‘महेंद्रगिरी’ ही युद्धनौका आहे.
निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली अनेक उपकरणे आणि प्रणाली लघु आणि मध्यम उद्योजकांकडून खरेदी करण्यात आली आहेत.
‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
‘महेंद्रगिरी’ युद्धनौका प्रोजेक्ट 17 क्लास फ्रिगेट्स (शिवालिक क्लास) ची फॉलो-ऑन, अर्थात सुधारित आवृत्ती आहे.
यामध्ये सुधारित स्टेल्थ अर्थात विनाशिकेची वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि संवेदन प्रणाली आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे.