वेस्ट टू आर्ट पार्कमध्ये G-20 देशांची झलक, स्क्रॅपपासून कलाकृती
दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेसाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून दिल्ली सजवण्यात आली आहे.
नवी दिल्लीत 'वेस्ट टू आर्ट पार्क' सुरू झालं आहे. G-20 उपक्रमाअंतर्गत हे पार्क सुरू करण्यात आलं आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी या पार्कचं उद्घाटन केलं.
G-20 मधल्या देशांमधील प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या कलाकृती या पार्कमध्ये आहेत.
स्क्रॅपपासून या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत.
प्राणी आणि पक्ष्यांच्या एकूण 22 कलाकृती ‘वेस्ट टू आर्ट पार्क’मध्ये आहेत.
ललित कला अकादमीच्या कलाकारांनी या कलाकृती तयार केल्या आहेत.
नवी दिल्लीत कौटिल्य मार्गावर चाणक्यपुरीत हे पार्क आहे.
फेकल्या जाणार्या ऑटोमोबाईल्सच्या आणि बांधकाम साइट्सच्या स्क्रॅपचा (मेटल स्क्रॅप) वापर इथे करण्यात आलाय.
भंगारात टाकलेल्या धातूंपासून या कलाकृती बनवण्यात आल्या आहेत.
या कलाकृतींमध्ये कॅनेडियन बीव्हर, तुर्की रेडविंग, जपानी ग्रीन तितर, दक्षिण आफ्रिकन स्प्रिंगबोक आहे.
तसेच या कलाकृतींमध्ये जर्मन गरुड, इंडोनेशियन कोमोडो ड्रॅगन, फ्रेंच गॅलिक कोंबडा आणि अर्जेंटाइन प्यूमादेखील आहे.
चिमणी, अमेरिकन बायसन, ब्राझिलियन जग्वार, चीनचा लाल-मुकुट असलेला क्रेन, सौदी अरेबियाचा उंट, कोरियन मॅग्पी, ऑस्ट्रेलियन कांगारू यांच्याही कलाकृती इथे आहेत.
रशियन ग्रिझली अस्वल, मेक्सिकन गोल्डन-ईगल, ग्रेट ब्रिटनचा सिंह देखील पार्कात पाहायला मिळतो.