गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे.
10 दिवसांपर्यंत चालणारा सण गणेश चतुर्थी. या दिवशी बाप्पाची मूर्तीची घरी स्थापना केली जाते आणि त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो.
बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक. जे चवीसोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या मोदकाच्या फायद्याबाबत
मोदक चवीला खूप मस्त असतात. त्यामध्ये असलेले गूळ आणि नारळ शरीराला उर्जा देतात.
पचनाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांना मोदक नक्की खावा. यामधील गुळाची शक्ती पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
मोदकामधील असलेले नैसर्गिक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
मोदक आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात असलेले गूळ आणि नारळ रक्त स्वच्छ करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणतात.
गोड पदार्थ खाल्ल्याने मेंदूमध्ये आनंदाचे हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे मूड ताजेतवाने होतो.