जे वजन नियंत्रित ठेवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. शेंगदाणे खाण्याचे प्रमुख फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
शेंगदाणे हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. १०० ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे २५ ग्रॅम प्रोटीन असते, जे स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
यामध्ये फायबर आणि प्रोटीन जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे भूक नियंत्रित होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
Picture Credit: Pinterest
शेंगदाण्यामध्ये असणारे 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस् शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.
Picture Credit: Pinterest
यामध्ये विटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
उच्च फायबर आणि प्रोटीनच्या प्रमाणामुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
तळलेले आणि खारट शेंगदाणे खाण्याऐवजी कच्चे किंवा भाजलेले शेंगदाणे खाणे अधिक चांगले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री पाण्यात भिजवलेले शेंगदाणे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास त्यांचे पोषणमूल्य वाढते आणि ते सहज पचतात.