सदाबहार फुले जितकी सुंदर असतात तितकीच ती फायदेशीर देखील आहेत. त्याचा योग्यरित्या उपयोग केल्यास आजारांपासून आराम मिळू शकतो
सदाबहार झाडाची पाने आणि फुले रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करतात. आयुर्वेदामध्ये याचा काढा फायदेशीर मानला जातो.
या फुलापासून बनवलेल्या अर्काचे सेवन केल्याने रक्तदाब स्थिर राहण्यास मदत होते. दरम्यान याचे सेवन सल्ला घेतल्याशिवाय सेवन करु नका
अतिसार, पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्यांसाठी या औषधांचा वापर प्रामुख्याने केला जातो.
याचा लेप किंवा रस फोड, खाज सुटणे आणि त्वचेच्या संसर्गासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
जुन्या जखमांवर सदाबहार पानांचा रस लावल्याने त्या लवकर बऱ्या होतात आणि संसर्गही टाळता येतो.
सदाबहार व्हिकॅन्स्टीन आणि व्हिनब्लास्टाइन सारखे संयुगे असतात यामुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरले जातात.
याचा उपयोग मर्यादित प्रमाणात आणि तज्ञांच्या सल्ल्याने करा. तसेच गर्भवती महिला आणि लहान मुलांना यापासून दूर ठेवा