तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी रक्तदाब सामान्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोक अनेकदा उच्च रक्तदाबाकडे लक्ष देतात, पण कमी रक्तदाब सामान्य आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
Picture Credit: Pinterest
कमी रक्तदाब असणाऱ्यांनी कोणती लक्षण जाणवू शकतात आणि या लोकांनी कोणते पेय प्यावे ते जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
कमी रक्तदाब असणाऱ्या लोकांना योग्य आहार घेतल्यावर थकवा जाणवू शकतो. चक्कर येऊ शकते. तसेच मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास देखील होऊ शकतो. हात-पाय थंड पडणे, अंधुक दिसणे, दृष्टी धूसर होणे आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे ही देखील कमी रक्तदाबाची लक्षणे असू शकतात.
Picture Credit: Pinterest
कमी रक्तदाब असलेल्यांनी ओआरएससोबतच पाण्यात लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि चवीनुसार गूळ मिसळा. हे पेय कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तीला द्या.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला कमी रक्तदाबाची लक्षण जाणवत असेल तर कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेण्यापूर्वी तुमचा रक्तदाब तपासून घ्या. रक्तदाबाव्यतिरिक्त इतर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला वारंवार कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल आणि चक्कर, अशक्तपणा किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका, तर डॉक्टरांकडून त्याचे खरे कारण शोधून त्यावर योग्य उपचार करून घ्या
Picture Credit: Pinterest
डिहायड्रेशन, काही औषधे, रक्तस्राव किंवा इतर आरोग्यविषयक कारणांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.