Hydropower Project म्हणजे नेमकं काय? वीज निर्मितीसाठी काय-काय लागतं?

Science Technology

27 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

योग्य जागा सर्वात महत्त्वाची

Hydropower Project साठी पाण्याचा मुबलक स्रोत आणि पाण्याच्या उंचीतील पुरेसा फरक महत्त्वाचा असतो. त्यामुळे नदीचा प्रवाह, भूभाग आणि वर्षभरातील पाण्याची उपलब्धता तपासली जाते.

Picture Credit: Pinterest

धरण बांधणं आवश्यक आहे का?

मोठ्या प्रकल्पात धरण बांधून पाणीसाठा केला जाऊ शकतो. मात्र, प्रत्येक प्रकल्पासाठी धरण आवश्यक नसतं. काही प्रकल्प नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करूनही वीज निर्माण करतात.

Picture Credit: Pinterest

पाण्यासाठी खास पाइपलाइन

मोठ्या प्रकल्पात धरण बांधून पाणीसाठा केला जाऊ शकतो. मात्र, प्रत्येक प्रकल्पासाठी धरण आवश्यक नसतं. काही प्रकल्प नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करूनही वीज निर्माण करतात.

Picture Credit: Pinterest

पाण्यासाठी खास पाइपलाइन

पाण्याला टर्बाइनपर्यंत पोहोचवण्यासाठी Penstock नावाची मोठी पाइपलाइन वापरली जाते. पाण्याचा दाब आणि प्रवाह यांचा योग्य वापर करून टर्बाइन फिरवण्याची व्यवस्था केली जाते.

Picture Credit: Pinterest

टर्बाइन करते महत्त्वाचं काम

वेगाने वाहणारं किंवा उंचीवरून खाली येणारं पाणी टर्बाइनची पाती फिरवतं. पाण्याच्या ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम टर्बाइन करते.

Picture Credit: Pinterest

जनरेटरमधून तयार होते वीज

टर्बाइनला जोडलेला जनरेटर फिरल्यामुळे वीज निर्माण होते. याच प्रक्रियेमुळे पाण्याच्या प्रवाहातून घरं, कार्यालयं आणि उद्योगांसाठी वापरता येणारी विद्युत ऊर्जा मिळते.

Picture Credit: Pinterest

ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्या

वीज निर्माण झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने व्होल्टेज वाढवलं जातं. त्यानंतर वीजवाहिन्या आणि सबस्टेशनच्या माध्यमातून वीज वितरण यंत्रणेपर्यंत पोहोचवली जाते.

Picture Credit: Pinterest

परवानग्या आणि खर्चही महत्त्वाचे

प्रकल्पासाठी तांत्रिक सर्वेक्षण, आर्थिक नियोजन, जमीन आणि आवश्यक सरकारी परवानग्या लागतात. पर्यावरणावरील परिणाम, नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि स्थानिक लोकांच्या हिताचाही विचार करावा लागतो.

Picture Credit: Pinterest

किती वीज तयार होणार?

प्रकल्पातून किती वीज तयार होईल, हे पाण्याचा प्रवाह, पाणी किती उंचीवरून खाली येतं आणि यंत्रणेची कार्यक्षमता यावर ठरतं. त्यामुळे प्रकल्पाचं ठिकाण आणि आराखडा योग्य निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

Picture Credit: Pinterest