Bed मध्ये असलेलं Engineering Wood नेमकं काय असतं? नावावरून फसू नका!

Science Technology

05 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Bed, Wardrobe घेताना ‘Engineering Wood’ ऐकलंय? हे नेमकं कोणतं लाकूड आहे? Particle Board, MDF आणि Plywoodमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या.

Engineering Wood म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

‘Engineering Wood’ हे एखाद्या एका Boardचं नाव नाही. लाकडाचे तुकडे, Fibres किंवा Veneers प्रक्रिया करून तयार केलेल्या अनेक Boardsना या Categoryमध्ये समाविष्ट केलं जातं. म्हणून फक्त ‘Engineered Wood’ ऐकून Quality ठरवू नका.

Engineering Wood म्हणजे एकच Material नाही!

Picture Credit: pinterest

लाकडाचे छोटे तुकडे, Sawdust आणि इतर Wood Particles Resinसोबत दाबून Particle Board तयार केला जातो. हा पर्याय तुलनेने स्वस्त असल्याने Budget Furnitureमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण पाण्यापासून याला धोका जास्त असतो.

Particle Board कशापासून बनतो?

Picture Credit: pinterest

MDFमध्ये अतिशय बारीक Wood Fibres वापरले जातात. त्यामुळे त्याचा Surface गुळगुळीत आणि एकसारखा असतो. Paint, Design किंवा Decorative Shuttersसाठी MDF उपयोगी ठरतो. मात्र, सामान्य MDF पाण्याच्या संपर्कासाठी योग्य नसतो.

 MDF कशासाठी चांगला?

Picture Credit: pinterest

Plywoodमध्ये लाकडाच्या पातळ थरांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोडले जाते. यामुळे त्याला चांगली Strength, Load-Bearing क्षमता आणि Screw-Holding क्षमता मिळते. म्हणून टिकाऊ Furnitureसाठी Plywoodचा वापर केला जातो.

Plywood का मजबूत मानलं जातं?

Picture Credit: pinterest

Kitchen, Bathroom किंवा Sinkजवळ Furniture असेल तर Moisture Resistance महत्त्वाची ठरते. सामान्य Particle Board आणि MDFला पाण्यामुळे नुकसान होऊ शकतं. अशा ठिकाणी योग्य Gradeचं BWP Plywood अधिक योग्य पर्याय ठरू शकतं.

पाणी लागणाऱ्या जागी कोणता Board?

Picture Credit: pinterest

Bedवर दररोज वजन आणि हालचालींचा भार येतो. त्यामुळे Frameसाठी मजबूत Material महत्त्वाचा आहे. Plywood किंवा Engineered Plywood दीर्घकाळ वापरासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

Bedसाठी कोणता Material?

Picture Credit: pinterest

Wardrobeच्या Carcassसाठी Pre-Laminated Particle Board हा Budget-friendly पर्याय ठरू शकतो. तर MDFचा वापर Shutters आणि Decorative Finishसाठी केला जातो. TV Unitसारख्या Dry Area Furnitureसाठी MDF किंवा Pre-Laminated Particle Board वापरता येतो.

Wardrobe आणि TV Unitसाठी काय?

Picture Credit: pinterest

Furnitureवर फक्त ‘Engineered Wood’ लिहिलं आहे म्हणून लगेच खरेदी करू नका. योग्य Furniture निवडताना Materialचं नाव नव्हे, तर त्याचा Type आणि Grade महत्त्वाचा आहे.

Furniture घेताना ही चूक करू नका!

Picture Credit: pinterest