निर्जंतुकीकरणापासून बनावट नोटा ओळखण्यापर्यंत! UV LED Bulb चे भन्नाट उपयोग

Science Technology

03 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सामान्य LED बल्ब पांढरा किंवा पिवळसर प्रकाश देतो. मात्र UV LED Bulb अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणे निर्माण करतो. या प्रकाशाचा वापर विशिष्ट कामांसाठी केला जातो.

UV LED Bulb म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

UV म्हणजे Ultraviolet. हा प्रकाश इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा भाग आहे. त्याची तरंगलांबी साधारण 100 ते 400 नॅनोमीटर असते. तो मानवी डोळ्यांना थेट दिसत नाही.

काय असते UV लाईट?

Picture Credit:pinterest

या बल्बमध्ये खास सेमीकंडक्टर मटेरियल वापरले जाते. त्यातून विद्युत प्रवाह गेल्यावर इलेक्ट्रॉनची ऊर्जा बदलते आणि विशिष्ट तरंगलांबीचा अल्ट्राव्हायोलेट प्रकाश तयार होतो.

कसे तयार होतात UV किरण?

Picture Credit:pinterest

या बल्बमध्ये खास सेमीकंडक्टर मटेरियल वापरले जाते. त्यातून विद्युत प्रवाह गेल्यावर इलेक्ट्रॉनची ऊर्जा बदलते आणि विशिष्ट तरंगलांबीचा अल्ट्राव्हायोलेट प्रकाश तयार होतो.

कसे तयार होतात UV किरण?

Picture Credit:pinterest

UV प्रकाशाचे UVA, UVB आणि UVC असे तीन प्रकार आहेत. UVA चा वापर ब्लॅकलाइटसाठी, तर UVB चा वापर काही वैद्यकीय उपचारांमध्ये केला जातो. UVC चा वापर निर्जंतुकीकरणासाठी केला जाऊ शकतो.

UV प्रकाशाचे तीन प्रकार

Picture Credit:pinterest

UV प्रकाश काही विशिष्ट पदार्थांवर पडल्यावर ते पदार्थ फ्लोरोसन्स प्रक्रियेमुळे दृश्यमान प्रकाश उत्सर्जित करतात. त्यामुळे पांढरे कपडे, काही रंग आणि विशेष शाई चमकताना दिसतात.

वस्तू चमकताना का दिसतात?

Picture Credit:pinterest

UV LED तंत्रज्ञानाचा वापर प्रिंटिंग, नेल आर्ट, रेजिन क्युरिंग आणि विशेष कोटिंग सुकवण्यासाठी केला जातो. योग्य तरंगलांबीमुळे काही पदार्थ कमी वेळेत घट्ट होतात.

उद्योगांमध्येही उपयोग

Picture Credit:pinterest

काही नोटा आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवर UV प्रकाशात दिसणारी सुरक्षा चिन्हे असतात. UV लॅम्पच्या मदतीने ही चिन्हे तपासता येतात.

बनावट नोटा ओळखण्यासाठी मदत

Picture Credit:pinterest

विशिष्ट UVC LED उपकरणांचा वापर हवा, पाणी आणि पृष्ठभागावरील सूक्ष्मजीव निष्क्रिय करण्यासाठी केला जातो. मात्र त्यासाठी योग्य डोस आणि उपकरणांची रचना महत्त्वाची असते.

निर्जंतुकीकरणासाठी वापर

Picture Credit:pinterest

UV किरणांचा थेट संपर्क डोळे आणि त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. विशेषतः UVC लॅम्प सुरू असताना त्याच्याकडे पाहू नये किंवा त्वचेचा संपर्क होऊ देऊ नये. सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

वापरताना घ्या काळजी

Picture Credit:pinterest