साडेसाती हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल पण याचा अर्थ काय ते आपण आज जाणून घेऊयात.

ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती म्हणजे ज्या काळात माणसाला खूप शारिरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असा  काळ.

ज्या राशीत शनी निवास करतो त्या राशीची साडेसाती सुरु होते. 

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाच्या आयुष्यात साडेसाती तीन वेळा येण्याची शक्यता असते.

एका राशीत शनी अडीच वर्ष राहतो.

दर 30 वर्षांनी माणसाला आयुष्यात शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो.

साडेसातीचा काळ हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात कठिण काळ मानला जातो.

शनीची साडेसाती तीन टप्प्यात येते. यातला दुसरा टप्पा सगळ्यात जास्त त्रासदायक असतो.

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनीदेव आणि हनुमानाची पूजा करतात.