रात्रभर झोपल्याने तोंडात जंतू जमा होतात. सकाळी उठल्यावर लगेच दात घासल्याने या जंतूंचा नाश होतो.
Picture Credit: Instagram
डॉक्टरांच्या मते, नाश्त्याआधी दात घासणे चांगले असते. पण जर तुम्ही आंबट पदार्थ घेत असाल, तर नाश्त्यानंतर ३० मिनिटांनी घासा.
दिवसभर खाल्लेल्या अन्नाचे जंतू तोंडात राहतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी दात घासल्यास किड होण्याचा धोका कमी होतो.
सकाळी आणि रात्री हे दोन वेळा नियमितपणे दात घासल्याने तोंडाची स्वच्छता राखली जाते आणि दुर्गंधी टळते.
अशा पदार्थांमुळे तोंडात अॅसिड तयार होतो. अशा वेळी लगेच दात घासल्यास दातांची बाह्य आवरणं कमजोर होऊ शकतात.
मद्यपान, धूम्रपान किंवा गुटखा खाण्याची सवय असेल तर लगेचच दात साफ करा.
शक्य असल्यास प्रत्येक जेवणानंतर ब्रश किंवा कमीत कमी पाणी व तोंड स्वच्छ करणे गरजेचे आहे.