Published Nov 21, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
पश्चिम अटलांटिक महासागरात बर्म्युडा ट्रँगल नावाचं क्षेत्र आहे. याला डेव्हिल्स ट्रँगल असेही म्हणतात.
हे क्षेत्र मियामी (फ्लोरिडा), बर्म्युडा आणि पोर्तुगालच्या अझोरेस बेटांमधला भाग व्यापते.
बर्म्युडा ट्रँगलमध्ये जहाजे आणि विमाने बेपत्ता होण्याच्या घटना नेहमीच चर्चेचा विषय असतो.
बर्म्युडा ट्रँगलमध्ये किती जहाजे बेपत्ता झाली आणि त्यांचे अवशेष कधी सापडले का?
20 व्या शतकाच्या मध्यात लोकांना बर्म्युडा ट्रँगलबद्दल प्रथम माहिती मिळाली.
1918 मध्ये, USS Cyclops नावाचे नौदलाचे जहाज, सुमारे 309 लोक या भागात अचानक गायब झाले.
दुसरी सर्वात मोठी घटना 1945 मध्ये घडली जेव्हा फ्लाइट 19 या भागात बेपत्ता झाले.
उड्डाण बेपत्ता झाल्यानंतर जेव्हा एक रेस्क्यू विमान त्याचा शोध घेण्यासाठी गेले तेव्हा तेही या भागात गायब झाले.
1948 साली स्टार टायगर (1948) आणि DC-3 (1948) ही आणखी दोन जहाजे गायब झाली.
काही अहवालांनुसार, या भागात 1,000 हून अधिक जहाजे आणि विमाने बेपत्ता झाली आहेत.
बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झालेल्या जहाजांचे आणि विमानांचे अवशेष सापडत नाहीत.
या भागातील वादळ आणि खराब हवामानामुळे जहाज आणि विमान बेपत्ता झाली, असा अंदाज अनेकांनी वर्तवला.
असे म्हटले जाते की, इथे खोल समुद्रातील खड्डे आणि समुद्रातील प्रवाहांचे एक जटिल नेटवर्क आहे, जे सहजपणे जहाजे त्याच्या आत ओढू शकते.
बर्म्युडा ट्रँगलला एलियन जगाचा दरवाजा देखील म्हटलं जातं.