Published Sept 26, 2024
By Harshada Patole
Pic Credit - social media
रुद्राक्ष आणि भद्राक्ष मध्ये काय फरक आहे?
हिंदू धर्मात रुद्राक्ष आणि भद्राक्ष या दोन्हींनाही खूप महत्त्व आहे.
.
मान्यतेनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे. तर भद्राक्षचा संबंध माता भद्रकालीशी आहे.
.
दोन्ही बिया त्यांच्या उपचार गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. दोन्ही हार, बांगड्या तयार करण्यासाठी वापरले जातात.
रुद्राक्षाचा उपयोग वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी, तर भद्राक्षाचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
रुद्राक्षाचे 21 प्रकार आहेत, त्यापैकी 11 प्रकारच्या रुद्राक्षांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, तर भद्राक्ष फक्त एकाच प्रकारचा आहे.
रुद्राक्ष पाण्यात टाकल्यास तो पूर्णपणे बुडतो, तर भद्राक्ष पाण्यात बुडण्याऐवजी तरंगतो.
भद्राक्षाचा वापर कोणत्याही प्रकारच्या पूजा-विधीमध्ये केला जात नाही. भद्राक्ष हे मृत्यूचे प्रतीक मानले जाते.
भद्राक्षाचा वापर कोणत्याही प्रकारच्या पूजा-विधीमध्ये केला जात नाही.